Thursday 7 July 2016

school information

शाळेचेनाव:

          कै.विजया गोपाळ गांधी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक 

                       आश्रमशाळा उतेखोल , माणगांव,  रायगड 

पत्ता :

         मु. उतेखोल ,पो. माणगांव , ता. माणगांव , जि  .रायगड,  महाराष्ट्र   पिन -४०२१०४

अक्षांश / रेखांश : 18.247,73.294


शाळेविषयी माहिती : 

          आमची शाळा ही वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र या संस्थेची शाळा आहे. आमची आश्रमशाळा ही निवासी आश्रमशाळा आहे आमच्या शाळेत इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत  एकूण ४५० आदिवासी विद्यार्ती शिक्षण घेत आहेत. 

            आमची शाळा




  गुगल अर्थवर आमची शाळा 




 शाळा परिसरातील वातावरण :





  'Learning science Through Innovation'  या कार्यशाळेविषयी 
                

IISER पुणे येथे ४ जुलै ते ८ जुलै २०१६ दरम्यान झालेल्या या कार्यशाळेमध्ये आमच्या शाळेतील खालील चार विद्यार्थी व एक शिक्षक सहभागी झाले होते .


शिक्षकांचे नाव  :      श्री. आर.आर .पडवळ
विद्यार्थ्यांचे नावे :    १)कु.  संदीप महादू वाघ           इ. ९वी
                       २) कु. राहुल दमा हंबीर            इ. ९वी
                       ३) कु. प्रभाकर भाग्या हंबीर        इ. ९वी
                       ४) कु. मोहन शांताराम हिलम      इ. ९वी

Project management and planning

या प्रकल्पात आम्ही खालीलप्रमाणे कार्यवाही करणार आहोत

१) आम्ही कचरा डेपोचे फोटो त्याच्या अक्षांश रेखांश व दिनांकानुसार घेणार आहोत

२) आम्ही तीन प्रकारचे सर्व्हे करणार आहोत
 अ ) माणगाव मधील कचरा डेपोच्या परिसरातील प्रदूषण हे https://earth.nullschool.net/ वरून पाहणार आहोत तसेच माणगाव पासून जवळ असलेल्या पण कचरा डेपो नसलेल्या गावाच्या प्रदूषणाच्या नोंदी पण या वेबसाईट वरून घेणार आहोत . त्यासाठी नोंदीचे तक्ते खाली दिले आहेत

 ब ) आम्ही कचरा डेपो जवळील काही डौक्तर यांच्या भेटी घेणार आहोत त्यांना कचरा डेपो मुले रुग्ण संख्येतील बदला विषयी माहिती घेणार आहोत त्याच्या नोंदीचा तक्ता खाली दिला आहे


 क) तसेच कचरा डेपोच्या जवळील काही घरांचा सर्व्हे करून मागील वर्षभरात झालेले आजाराची माहितीचा सर्व्हे करणार आहोत . तसाच सर्वे हा कचरा डेपो पासून दूर रहाणा-या नागरिकांचा सुद्धा करणार आहोत. या सर्व्हेच्या नोंदीचे तक्ते खाली दिले आहे


५) शाळे जवळची एक घाणेरडी जागा पूर्ण पणे स्वच्छ करनर आहोत .
उदा. http://www.theuglyindian.com/dumps.html

Reference link:-
www.nullschool.com

Wednesday 6 July 2016

Learning Science Through Innovation at IISER, Pune

उपक्रम / कार्यशाळा :   'Learning Science Through Innovation'
   

कार्यशाळेविषयी माहिती :
                          विज्ञान आश्रम व IISER यांनी आयॊजीत केलेल्या 'Learning Science Through Innovation' या पाच दिवसाच्या कार्यशाळेमध्ये आम्ही संशोधन कसे करतात त्याची कार्यपद्धती शिकायला मिळाली. या कार्यशाळेत IBT ची कौशल्ये व विज्ञानाची तत्वे यांच्या एकत्रित सहयोगाने आपण आपल्या समस्या आपण स्वतः संशोधन करून सोडवू शकतो हे शिकलो .कार्यशाळेत संशोनासंबंधी तज्ञ मार्गदर्शकांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले . कार्यशाळेत आम्ही 'कल्पना विस्फोट' या उपक्रमाद्वारे शेती, पर्यावरण व ऊर्जा या तीन विषयातील समस्यांवर विचार केला व त्यामधून आम्ही आमच्या शाळेतील पर्यावरणाशी संबंधित कचऱ्याची समस्येवर प्रकल्प करायचे ठरवले आहे. 

 प्रकल्प निवड : 
          आमच्या शाळेच्या समोरील परिसरात माणगांव गावातील कचरा डेपो आहे तेथे दररोज गावातील कचरा आणून टाकला जातो या कचऱ्याचा आमच्या शाळेतील विद्यार्थ्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो की नाही हे अभ्यासण्यासाठी आम्ही हा प्रकल्प करायचे ठरवले आहे  


 प्रकल्पाचे नाव :
आश्रमशाळेच्या समोरील कचरा डेपोच्या प्रदूषणाचा विद्यार्थ्यांच्या व सभोतालच्या लोकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासणे


 उद्देश  :  १. विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजी घेणे
              २. कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण कमी करणे
         
गरज  समस्या :
                 १.  ओल्या कचऱ्याचा दुर्गंध
                 २. प्लॅस्टिक कचऱ्याच्या जाळण्याने श्वसनाचे विकार
                 ३.  वायू प्रदूषणाचा त्रास 

उपाय :
        १. कचरा डेपो दूर हटवणे
        २. कचऱ्यातील प्रदूषकांचे वर्गीकरण करणे .प्रकार ओळखणे
        ३. कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंची माहिती व प्रमाणाच्या नोंदी ठेवणे
        ४. त्या विषारी वायूंमुळे होणाऱ्या आजाराची  माहिती मिळवणे
        ५. ओल्या कचऱ्याचे सेंद्रिय खत तयार करणे
        ६. प्लास्टिकचे पुनर्चक्रीकरण करणे
        ७.